देवळाली कॅम्प परिसरात दोन बिबटे जेरबंद

मंगळवार, 31 जानेवारी 2023 (15:16 IST)
नाशिक : देवळाली कॅम्प परिसरात बनात चाळ व वडनेर दुमाला परिसरात दोन बिबट्यांना जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. येथील बनात चाळ परिसरातील नाल्यामध्ये लावलेल्या पिंजर्‍यात एक बिबट्या जेरबंद झाला असून त्याला वनविभागाच्या अधिकार्‍यांनी पिंजर्‍यासह बिबटया ताब्यात घेत नाशिकला गंगापूर रोपवाटिकेत ठेवण्यात असल्याची माहिती वनाधिकारी यांनी दिली.
 
देवळाली कॅम्प परीसर घनदाट झाडीनी वेढला असून बिबट्याचा वावर वाढला आहे येथील रेस्ट कॅम्प रोडवरील बनात चाळ पगारे चाळ जवळील नाल्यात वणविभागने लावलेल्या पिंजर्‍यात सोमावरी रात्री एक बिबट्या जेरबंद झाला. त्याला बघण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यातील महिला पोलिस अधिकारी वैशाली मुकणे यांनी भेट दिली.
 
बिबटया जेरबंद झाल्याची माहिती मिळताच वनाधिकारी प्रविण गोलाईत, वनरक्षक दर्शन देवरे, विशाल शेळके, विजय साळुंखे, वाहन चालक शरद अस्वले यांनी घटनास्थळी भेट देत पिंजरा ताब्यात घेतला.याच परिसरात आणखीही काही बिबटे आहे त्यांना जेरबंद करण्यासाठी तातडीने पिंजरा लावावा अशी मागणी संतोष पगारे, विक्की हिरे, विजय बैद, सुजित जाधव, सुयोग तपासे, अविनाश घेगडमलसह महिला वर्गाने केली आहे.
 
वडनेर दुमालातही बिबट्या जेरबंद
आज पहाटे वडनेर दुमाला येथील रेंज रोड वरील बाजीराव पूजा पोरजे यांच्या मळ्यात एक बिबट्या जेरबंद झाला असून पिंजर्‍यसह बिबटया वनरक्षक गोविंद पंढरे वनमजूर निवृत्ती कोरडे वाहनचाल अशोक खानझोडे रेस्क्यू टीम नाशिक सुरक्षित घेऊन गंगापूर रोपवाटिका येथे ठेवला आहे.
 
Edited By - Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती