सिन्नर येथे दोन बिबट्यांची नारळाच्या झाडावर चढून मस्ती

रविवार, 18 सप्टेंबर 2022 (13:52 IST)
नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्याचा पूर्व भागातील सांगवी येथे दोन बिबट्यांची झाडावर चढून मस्ती करण्याचे दृश्य शेतकऱ्यांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केले असून ते सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 
नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील सांगवी येथे दोन बिबटे चक्क नारळाच्या झाडावर दिसून आले. झाडावर सुमारे पन्नास ते साठ फुट उंचीवर त्यांनी एकमेकांवर डरकाळ्या फोडत आव्हानही दिले. हा व्हिडीओ आता मोठा चर्चेचा विषय ठरत आहे
 
सिन्नर तालुक्यात सांगावीत दिलीप कोंडाजी घुमरे आणि सुनील सखाहरी घुमरे यांच्या वस्तीजवळ गेल्या चार दिवसांपासून अवघ्या 50 फूट अंतरावर एका बिबट्याने मुक्काम केला असून आज सकाळी 7 :30 वाजेच्या सुमारास सुनील घुमरे यांच्या मकाच्या पिकात बिबट्याची नारळाच्या झाडावर मस्ती केल्याचे दृश्य दिसले आहे. नारळाच्या झाडावर आधी एक बिबटा चढला नंतर त्याला पकडण्यासाठी दुसऱ्या बिबट्याने चढण सुरु केले. नंतर हळूहळू सरकत बिबटे खाली उतरले. घरातील सर्वांनाच बोलावून सावधगिरी बाळगण्यास सांगितले. 
 
काही वेळातच झाडावरून बिबट्या खाली येत असतानाच मक्याच्या शेतात असलेल्या दुसऱ्या बिबट्याने त्याच्यावर डरकाळी फोडत हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यात दोघेही सरासर नारळाच्या झाडावर चढले. एकमेकांवर डरकाळी फोडून पुन्हा एक बिबट्या खाली उतरला. हा सर्व प्रकार घुमरे कुटुंबीयांनी मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केला.त्यांच्या मस्तीचे हे दृश्य शेतकरयांनी आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केले असून ते सध्या व्हायरल होत आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यावर वन्य विभागाच्या अधिकाऱ्यांना ही माहिती मिळाल्यावर ते घटनास्थळी रवाना झाले आणि त्या बिबट्यांना पकडण्यासाठी शेतात पिंजरा लावण्याचे सांगितले जात आहे.   

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती