जालन्यात आजीला लुटून गळा आवळून खून करण्या प्रकरणी दोघांना अटक

शुक्रवार, 2 मे 2025 (17:19 IST)
जालना जिल्ह्यातील एका गावात दोन तरुणांना त्यांच्या 65 वर्षीय आजीला लुटल्याच्या आणि गळा आवळून ठार  मारल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. 
ALSO READ: लाडक्या बहिणींचा एप्रिल-मे महिन्याच्या हफ्ता एकदम 3000 मिळणार?
आरोपी प्रदीप ढाकणे (22) आणि त्याचा चुलत भाऊ संदीप ढाकणे (26) यांना गुरुवारी मध्य प्रदेश सीमेजवळ अटक करण्यात आली, असे पोलिसांनी सांगितले. त्यांनी सांगितले की, केसरभाई ढाकणे या 29 एप्रिल रोजी भोकरदन तालुक्यातील चांदई एको गावात त्यांच्या घरात मृतावस्थेत आढळल्या होत्या.
 पोलिसांनी शुक्रवारी सदर माहिती दिली. 
ALSO READ: मंत्री पंकजा मुंडे यांना त्रास देणाऱ्या आरोपीला न्यायालयाने २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत केसरबाई ढाकणे यांचा गळा आवळून खून केला. त्यांचा एक कान कापलेला होता. सोन्याचे कानातले काढून घेण्यासाठी असे केले असावे. 
ALSO READ: बीड : टायर फुटल्याने पिकअप उलटला, ३ जणांचा मृत्यू, १९ जखमी
हासनाबाद पोलीस ठाण्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले की, घटनेनंतर आरोपी फरार असून आजीच्या अंत्यसंस्काराला आले नाही या मुळे पोलिसांना संशय आला. पोलिसांनी आरोपींना चोरीच्या दागिन्यांसह अटक केली आहे. पोलीस प्रकरणाचा पुढील तपास केला आहे. 
 Edited By - Priya Dixit 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती