मराठा आरक्षणावरून राज्यात तीव्र आंदोलने सुरु आहे. मराठा आरक्षणाचे आंदोलनाचे तीव्र पडसाद पडत आहे. मराठा आरक्षणाची मागणी करण्याऱ्या काही आमदारांना आज पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे हे आमदार काल पासून विधानसभा आणि मंत्रालयच्या गेटला टाळे ठोकून पायऱ्यांवर आंदोलनंला बसले होते. यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
मराठा आरक्षणासाठी अधिवेशन बोलवण्याची मागणी आमदारांनी केली आहे. राज्यभरात मराठा आरक्षणासाठी ठिकठिकाणी आंदोलने सुरु आहे. बीड, धाराशिव मध्ये संचारबंदी करण्यात आली आहे. आरक्षणासाठी आत्महत्येचे सत्र सुरु आहे. खासदार आणि आमदारांच्या वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ केली आहे.
आंदोलनाचे तीव्र पडसाद दिसत आहे. आमदार अमोल मिटकरी, निलेश लंके , कैलास पाटील, राजू नवघरे, राहुल पाटील, विक्रम काळे, चेतन तुपे, दिलीप बनकर, यशवंत माने, चेतन तुपे, बाबाजानी दुर्रानी, मोहन उंबर्डे, बाबासाहेब आजबे, या आमदारांनी मराठा आरक्षणासाठी अधिवेशन बोलावण्याची मागणी केली आहे.