निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने ट्रू मतदार अ‍ॅप’ विकसित

शुक्रवार, 13 जानेवारी 2017 (16:14 IST)
राज्यातील स्थानिक निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने ट्रू मतदार अ‍ॅप’ विकसित केले आहे.  त्यावरून मतदारांना निवडणुकीसंदर्भातील सर्व माहिती मोबाईलवर उपलब्ध होणार आहे. मतदानासंदर्भातील माहितीसोबतच उमेदवारांचा तपशील आणि निवडणुकीचा निकालही अ‍ॅपवर उपलब्ध होणार आहे. यासाठी ट्रू व्होटर’ नावाचे मोबाईल अ‍ॅप विकसित करण्यात आले आहे. या अ‍ॅपवर मतदारांना मतदार यादी, त्यातील स्वतःचे नाव, अनुक्रमांक, मतदान केंद्र याबाबतही इत्यंभूत माहिती उपलब्ध होणार आहे. तसेच निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांचा त्यांच्या खर्चासह तपशीलही पाहता येईल. याच अ‍ॅपवर निवडणुकीचा निकाल मिळू शकणार आहे.

वेबदुनिया वर वाचा