भिवंडीतील आरजू शेख (23) या महिलेस व्हॉट्सअॅपवर तिहेरी तलाक दिला आहे. पीडित महिलेने पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यासाठी आणि महिला हक्क आयोगाकडे धाव घेतली आहे. कल्याणमध्ये टेक्निकल इंजिनीअर म्हणून काम करणार्या नदीमसोबत 18 मे 2014 रोजी मुस्लिम धार्मिक रीतीरिवाजाप्रमाणे आरजू शेखचा निकाह झाला होता. त्यावेळी हुंडा म्हणून आरजूच्या आई-वडिलांनी नदीम यास 10,051 रुपये व संसारोपयोगी वस्तू भेट दिल्या होत्या. लग्नानंतर मात्र लगेचच आरजूचा छळ सुरू झाला. तिला मारझोड करणे, शिवीगाळ करणे, तू पसंत नाही असे ऐकवत मारझोड करणारा नदीम तिच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला. तरीही आरजूने पाच वर्षे संसार टिकवून ठेवला.