श्री त्र्यंबकेश्वर येथे पेड दर्शन घोटाळा

शनिवार, 3 फेब्रुवारी 2018 (11:41 IST)

संपूर्ण देशात भाविकांचे श्रद्धा स्थान असलेले आणि १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री त्र्यंबकेश्वर मंदिराच्या त्र्यंबकेश्वर मंदिर ट्रस्ट  नेहमीच वादाच्या अडकेल्या असतांना आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. त्र्यंबकेश्वर येथील मंदिरात  देणगी दर्शनात लाखोंचा घोटाळा उघड होत असून यामध्ये  दोघांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये देणगी रक्कम अपहार करत मोठा घोटाळा समोर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

यामध्ये श्री त्र्यंबकेश्वर मंदिराच्या देव स्थानात पेडदर्शनाचा नवा घोटाळा समोर आला आहे.  या प्रकरणात सध्या उघड झालेल्या  अडीच लाखाचा घोटाळयाप्रकरणी गुन्हा दाखल झाला असला तरी यात मोठे रॅकेट असल्याची चर्चा आहे.

यामध्ये पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पेडदर्शनयासाठी मंदिरात 24 डिसेंबर 2017 ते 27  डिसेंबर या कालावधीत संशयित असलेले अमोल रामदास येले आणि देविदास परशुराम गोडे यांनी संगमताने ट्रस्टचे देणगी दर्शन कार्यालयातील cctv कॅमेरे चालू असताना आणि बंद करून भाविकांकडून दर्शन देणगी घेतली होती. मात्र त्या बदलल्यात त्याचे पास न देता स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी ट्रस्टचे 2 ते अडीच लाख रुपयांचा अपहार केला आहे. या प्रकरणी श्री त्र्यंबकेश्वर मंदिराचे मुख्य सुरक्षा अधिकारी अमित अशोक टोकेकर यांनी फिर्याद दिली आहे. या प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल असून दोघांवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये  अवघ्या पाच दिवसात अडीच लाख रुपयांचा अपहार झाला असेल तर यापूर्वी देणगी दर्शन रक्कम परस्पर किती घोटाळा झाला याची त्र्यंबकेश्वर येथे गावात चर्चा आहे. तरी याप्रकरणातील बडे मासे असल्याची चर्चा जोरात आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती