त्र्यंबकेश्वर येथे शासनाच्या ‘प्रसाद’योजनेतून पायाभूत सुविधांचा विकास : गिरीश महाजन

मंगळवार, 3 जुलै 2018 (08:41 IST)
महाजन म्हणाले, त्र्यंबकेश्वर, सप्तशृंग गड, नाशिक आणि शिर्डी येथील पर्यटनाला चालना देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. त्र्यंबकेश्वर येथे शासनाच्या ‘प्रसाद’योजनेतून पायाभूत सुविधांचा विकास करणयाबरोबरच रोप-वेची सुविधा निर्माण करण्यात येणार आहे. पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगार मिळावा असा शासनाचा प्रयत्न आहे. फ्युनिक्युलर ट्रॉलीमुळे  भाविकांना देवीचे दर्शन घेणे आधिक सुलभ होईल. गडावर डोलीचा व्यवसाय करणाऱ्यांना रोजगार मिळावा यादृष्टीने प्रयत्न केले जातील, असे त्यांनी सांगितले.
 
भुसे म्हणाले, सप्तशृंगी गडाचा ‘ब’वर्ग पर्यटन स्थळामध्ये समावेश करण्यात आला असून गडावरील विकासाला चालना देण्यासाठी 25 कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे. गड परिसरात पर्यटन विकासाच्या दृष्टीने कामे करण्यात येतील. यावेळी आमदार छगन भुजबळ यांनी मनोगत व्यक्त केले. मुख्य अभियंता हेमंत पगारे यांनी फ्युनिक्युलर ट्रॉली प्रकल्पाची माहिती दिली. कार्यक्रमाला सरपंच सुमनबाई सुर्यवंशी, मुख्य वनसंरक्षक रामाराव, अधीक्षक अभियंता रणजीत हांडे, कार्यकारी अभियंता किशोर केदार, बी. पी. वाघ, राजकुमार गुरूबक्षाणी, सोमनाथ लातुरे आदी  उपस्थित होते.

पाझर तलाव नुतनीकरणाच्या कामाचे लोकार्पण
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्पुर्वी गडावरील भवानी पाझर तलाव नुतनीकरण कामाचे लोकार्पण केले. त्यांनी कामाची पहाणी करून अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. तलावाच्या माती धरणाची लांबी 180 मी. असून धरणाची साठवण क्षमता 6.68 द.ल.घ.फूट आहे. चणकापूर धरण येथून 25 कि.मी.ची थेट पाईपलाईन करण्यात आली आहे. या तलावाच्या नुतनीकरणामुळे भाविकांसाठी पाण्याची चांगली सुविधा होणार आहे.मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्लास्टीक बाटल्यांवर प्रक्रिया करण्याच्या यंत्राचे उद्घाटनदेखील मुख्य कार्यक्रमानंतर करण्यात आले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती