आजपासून पावसाळी अधिवेशन , विरोधी पक्षांमध्येच फूट

सोमवार, 24 जुलै 2017 (11:17 IST)

सोमवारपासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होत असताना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या प्रमुख विरोधी पक्षांमध्येच फूट पडल्याचे चित्र अधिवेशनाच्या पूर्वसंध्येस पाहायला मिळाले. त्यामुळे सत्ताधारी निश्चिंत झाले आहेत. सरकारच्या कारभारात ‘झोल’ असल्याचा आरोप करत, मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर बहिष्कार घालण्याची घोषणा दोन्ही पक्षांनी स्वतंत्र पत्रकार परिषद घेत केली.

विधिमंडळाच्या उभय सभागृहांमध्ये येत्या ५ ऑगस्ट रोजी इंदिरा गांधी, दीनदयाळ उपाध्याय, नानाजी देशमुख, बाळासाहेब सावंत या दिवंगत नेत्यांबरोबरच शरद पवार आणि गणपतराव देशमुख यांचाही गौरव करणारा ठराव मांडण्यात येणार आहे. राजशिष्टाचारानुसार ठरावामध्ये इंदिरा गांधी यांचे नाव आधी येणे सयुक्तिक ठरते. पण विधान परिषदेत सदस्यसंख्या जास्त असलेल्या राष्ट्रवादीने शरद पवार यांच्या नावाचा ठराव आधी घ्यावा, असा आग्रह धरला आहे. त्यातून दोन काँग्रेसमध्ये वाद सुरु आहे.

वेबदुनिया वर वाचा