नाशिक पावसाने दडी मारल्याने शेती पिके धोक्यात आली आहे. येवला तालुक्यातील पारेगाव येथे टोमॅटो उत्पादक शेतकरी राजू सय्यद यांची टोमॅटोचे पीक वाचविण्यासाठी कळशी, तांब्याने पाणी देताना चे चित्र पहायला मिळत आहे.
राजू सय्यद या शेतकऱ्याने पाऊण एकर मध्ये टोमॅटोचे पीक घेतले होते. मात्र पावसाने दडी मारल्याने या शेतकऱ्याला आपले पीक वाचविण्यासाठी ताब्याने,कळशीने पिकाला पाणी घालण्याची वेळ आली असून पाऊस पडावा अशी प्रतीक्षा तालुक्यातील शेतकरी करीत आहे. या शेतकऱ्याला टोमॅटो पीक लागवडी करिता ४० ते ४५ हजार रुपये खर्च आला असून जर लवकर पाऊस पडला नाही तर केलेला पूर्ण खर्चसह पीक वाया जाईल. इकडून तिकडून पाणी आणून पीक वाचविण्याची धडपड या शेतकऱ्यांची चालू आहे.