छतावर झोपलेल्या इसमावर वाघाचा हल्ला

धारगाव- उन्हाळ्याच्या दिवसात दिवसभर शेतात काम करून थकूनमागून आलेल्या चित्तापूर येथील शेतकरी शैलेश रामभाऊ रेहपाडे हे रात्री आपल्या घराच्या छतावर झोपलेले असताना 4 एप्रिल रोजी रात्री 12 वाजताच्या दरम्यान घराच्या छतावर पायर्‍या चढून वाघाने शैलेशवर हल्ला चढविला.
आरडाओरड केल्यामुळे वाघ जिन्याचा पायर्‍या उतरून खाली आला. त्यामुळे शैलेशचा जीव वाचला. हल्ल्यात शैलेश गंभीर जखमी झाला. त्याला कुटुंबातील व्यक्तींनी भंडारा येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे.
 
दिवसेंदिवस उष्णतेचा प्रभाव वाढत आहे. जंगलातील पाण्याचे स्त्रोत आटत असल्याने वन्यप्राणी व हिंसक प्राणी गावाकडे पाण्याच्या शोधार्थ भटकंती करीत आहेत. वन्यप्राणी गावाकडे येत असताना शेतकर्‍यांचे पाळीव प्राणी शिकार होत आहेत. आता तर वन्यप्राण्यांनी मानवावरही हल्ले करणे सुरू केले आहे.

वेबदुनिया वर वाचा