सहकार्य करण्यासाठी 'हा' निर्णय घेतला : शरद पवार

शनिवार, 11 मार्च 2023 (08:03 IST)
नाशिक : नागालँडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं घेतलेल्या भूमिकेबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सविस्तर खुलासा केला आहे. ते नाशिकमध्ये बोलत होते. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हे स्पष्टीकरण दिलंय. “नागालॅंडमध्ये भाजपाला पाठिंबा दिला असं नाही. तर तिथल्या मुख्यमंत्र्यांना ऐक्याच्या दृष्टीने सहकार्य करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.” असं शरद पवार म्हणाले आहेत. 
 
यापुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, नागालॅंडमध्ये नागा समाजाचे काही प्रश्न आहेत. त्यामुळे सगळ्यांना एकत्र एकत्र आणण्यासाठी तेथील मुख्यमंत्री प्रयत्न करत आहेत. नागालॅंडमधील मुख्यमंत्री हे भाजपचे नाहीत. तिथे कोणताच पक्ष हा सत्तेबाहेर नाही. नागालॅंडमध्ये ७ जागांवर राष्ट्रवादी कॉंग्रेस जिंकली आहे. त्यामुळे तिथल्या लोकप्रतिनिधींनी भाजपसोबत न जाण्याचा निर्णय घेतला होता. परंतू तिथल्या नागा समाजातील ऐक्याच्या दृष्टीने मुख्यमंत्र्यांकडून जी पावले उचलली गेली आहेत, त्याला सहकार्य करण्यासाठी राष्ट्रवादीने तिथल्या मुख्यमंत्र्यांना पाठिंबा दिलाय.” असं देखील शरद पवारांनी स्पष्ट केल आहे.
 
यावेळी शरद पवारांनी राज्यातील कांदा प्रश्नी आपली भूमिका मांडली. नाफेडमधून अद्यापही कांदा खेरदी सुरू झालेली नाही. शासकीय संस्थानी कांदा खरेदी केला पाहिजे. अवकाळीचा फटका इतर पिकांनाही बसलाय. त्यामुळे सरकारने अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने मदत करावी, अशी मागणी देखील केलंय. तसंच राज्यात सुरू असलेला कांदा प्रश्न राज्यसभेत मांडणार असल्याचं देखील शरद पवारांनी सांगितलं.
Edited by : Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती