'त्या' धमकीला घाबरण्याचं कारण नाही : अजित पवार

गुरूवार, 4 फेब्रुवारी 2021 (16:22 IST)
साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादीचा गड राखण्यासाठी आमदार शशिकांत शिंदे प्रयत्न करत असून त्यातून राजकीय आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत.  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
 
“राजकारणात कोणी कोणाला धमकी देण्यात काही अर्थ नसतो. कदाचित कार्यकर्त्यांना बरं वाटावं, ते आपल्यासोबत राहावेत यासाठी कोणीतरी काहीतरी बोललं जातं. परंतू मला त्याबद्दल काहाही माहिती नाही. त्या धमकीला घाबरण्याचं कारण नाही,” अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी शिवेंद्रराजेंच्या वक्तव्यावर दिली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती