शहरात डेंग्युचा डंख वाढतोय

बुधवार, 13 सप्टेंबर 2023 (08:06 IST)
लातूर : घरात कोणी अनेकदा आजारी पडत असेल, त्याला अचानक ताप येत असेल, तर दुर्लक्ष करुन नका… कारण, तो डेंग्यू असू शकतो. लातूर शहर व जिल्ह्यात डेंग्यूचा उद्रेक फैलावत चालला असून, जानेवारीपासून ७१७ रुग्ण डेंग्यूसदृष्य आढळून आले आहेत. त्यातील १४ जणांना डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. शिवाय, ४ जणांना चिकन गुनिया झाल्याचे आरोग्य विभागाच्या पाहणीत उघड झाले आहे. डेंग्यू हा संसर्गजन्य आजार असून, त्यावर उपाययोजना करण्यासाठी मनपा आरोग्य विभाग तसेच जिल्हा आरेग्य विभागाकडून प्रयत्न सुरु आहेत.
 
वातावरणातील बदल आणि डासांच्या उत्पत्तीमुळे विविध कीटकजन्य आजारांच्या रुग्णांतही वाढ झाली आहे. लातूर शहरातील खासगी रुग्णालये व मनपा रुग्णालयात जानेवारीपासून आजअखेरपर्यंत ७१७ संशयित रुग्ण सापडले असून, त्यांच्या रक्­ताचे नमुने घेऊन तपासले असता १४ रुग्णांना डेंगी झाल्याचे आढळून आल आहे. तर दोन डेंग्यू सदृष्य रुगणांचा मृत्यू झाला आहे. मनचाआरोग्य विभागामार्फत डेंग्यूच्या साथीचा उद्रेक वाढू नयेत, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. सर्व आरोग्य कर्मचा-यांमार्फत दैनंदिन पाणी साठवलेल्या ठिकाणांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. जेथे शक्­यता असेल तेथे गप्पी मासे सोडण्यात येत आहेत. तुंबलेली गटारे वाहती करणे, रस्त्यातील खड्डे बुजविणे, डास जास्त असलेल्या ठिकाणी धुरळणी करणे आदी कामे मनपा मार्फत केली जात आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती