पोलिसांना कल्पना नाही, हे मोठं फेल्युअर आहे पोलिसांचं : फडणवीस

शनिवार, 9 एप्रिल 2022 (15:17 IST)
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार  यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यासंदर्भात विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पोलीस यंत्रणेचं अपयश असल्याचं म्हटलं आहे. 
 
मी हल्ल्याच्या संदर्भात निषेध व्यक्त केला आहे. महाराष्ट्रात असे हल्ले होणं योग्य नाहीए. त्यासोबत मी हे देखील सांगितलं आहे, एसटी कामगारांच्यासंदर्भातले मुद्दे योग्य फोरमवर मांडले जावेत, त्याला सरकारने प्रतिसादही द्यावा.
 
महत्त्वाचा प्रश्न हा निर्माण होतो की मीडियाला माहित होतं की अशा प्रकारे लोकं चाललेली आहेत. मीडियातील काही लोकांनी मला सांगितलं की त्यांना अडीच वाजता मेसेज आले होते, तर मग पोलीस काय करत होते असा सवाल फडणवीस यांनी म्हटलं आहे. 
 
इतक्या मोठ्या नेत्याच्या घरावर लोकं प्लॅनिंग करुन जातात. आणि पोलिसांना कल्पना नाही, हे मोठं फेल्युअर आहे पोलिसांचं. याची खरी चौकशी झाली पाहिजेत अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती