अवघ्या काही तासात अपहरण झालेल्या मुलीची सुटका नाशिकच्या अंबड पोलिसांनी केली आहे. दीड वर्षाच्या मुलीचे अपहरण करणाऱ्या संशयिताला पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे.अनिताकुमारी जितेंद्र भारती (वय २५, रा. बिल्डिंग नंबर 6 पाचवा मजला घर नंबर 511 चुंचाळे शिवार, घरकुल, अंबड, नाशिक) ह्या कामावर गेल्या होत्या.
दीड वर्षाच्या मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात आल्याने पोलिसांनी सुद्धा लागलीच तपास करण्यास सुरुवात केली. तपास सुरू असताना गोपनीय माहिती पोलिसना मिळाली. मुलीला अपहरणकर्त्याने कुठे लपवून ठेवले आहे, याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला. आरोपीला अटक करण्यासाठी अंबड पोलिसांच्या पथकाने सापळा रचला आणि आरोपीला अटक करण्यात आली.