उपमुख्यमंत्र्यांनी थेट राज्यपालांना दिला इशारा
राज्यपाल नियुक्त 12 आमदारांवरून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना इशारा दिला. राज्यपालांनी आपला अंत पाहू नये अशा शब्दात अजित पवारांनी उद्विग्नता व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सहीनिशी प्रस्ताव दिले आहे. तसंच 171 आमदारांचे बहुमत सिद्ध झालेलं आहे असा टोलाही त्यांनी बोलताना लगावला. आपण याबाबत राज्यपालांशी चर्चा करणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं.