तुम्हाला उद्या एक नमुना बघायला मिळेल, ठाकरे परिवाराचा घोटाळा समोर ठेवणार : सोमय्या

गुरूवार, 14 एप्रिल 2022 (17:17 IST)
तुम्हाला उद्या एक नमुना बघायला मिळेल, ठाकरे परिवाराचा घोटाळा समोर ठेवणार आहे, घोटाळेबाजांवर कारवाई होणारच अशा शब्दात किरीट सोमय्या यांनी आणखी एक घोटाळा उघडकीस आणण्याचे आव्हान दिले आहे. विक्रांत युद्धनौका बचाव प्रकरणात माझ्यावर झालेल्या आरोपांवर न्यायव्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास आहे. घोटाळ्याचा ५८ कोटींचा आकडा कुठून आला आहे, अशी विचारणा कोर्टानेही केली. त्यावर ठाकरे सरकार गप्प का ? असेही ते म्हणाले.

घोटाळा झाला म्हणून दहा वर्षानंतर आकडा ठेवतात. पोलीस ४२० कलमाखाली एफआयआर दाखल करतात अन् प्रेस नोट काढतात. हा १० वर्षानंतर कुठून घोटाळा आणला असाही सवाल किरीट सोमय्या यांनी केला. गेल्या तीन महिन्यात ठाकरेंनी १० वेळा नौटंकी केली. जेव्हा जेव्हा ठाकरे सरकारच्या मंत्री आणि नेत्यांवर कारवाई झाली तेव्हा असे स्टंट झाल्याचे किरीट सोमय्या म्हणाले. आयएनएस विक्रांत बचाव निधी घोटाळ्याच्या प्रकरणात कोर्टाकडून दिलासा मिळाल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
 
ठाकरे सरकारच्या नेत्याचा घोटाळा बाहेर काढले तेव्हा तेव्हा माझ्यावर आरोप करण्यात आले. किरीट सोमय्यांनी ७५०० कोटी अमित शहांना दिले एकही कागद देण्यात आला नाही. पंतप्रधानांना मोठे पत्र लिहिले की चार ईडी ऑफिसर आणि किरीट सोमय्या घोटाळा करतात. त्यानंतर एसआयटीही नेमली आता दोन महिन्यांनंतरही काहीही झालेले नाही. वसईच्या कंपनीत ४५० कोटी वाधवान यांनी टाकले, पण हेदेखील सिद्ध करता आले नाही. पालघरच्या कंपनीत २६० कोटी ईडीने टाकले. राकेश वाधवान पार्टनर आहे, त्यामध्येही काहीही सिद्ध झाले नाही. जुहू १०० कोटी जमीन घोटाळा, पवईचा ४३५ कोटींचा पीएपी घोटाळा या प्रकारे ठाकरे सरकारने मांडले. हे एक डझन घोटाळ्याचे आरोप करताना दगड मारायचा आणि पुढे जायचे इतक सोप उद्धव ठाकरेंना वाटते का ? आता ५८ कोटींचा घोटाळ्याचा आरोप केल्यावर हिशोब द्यावाच लागेल. होम वर्कसाठी नॉट रिचेबल होतो. नॉट रिचेबल काही व्यक्तींसाठी होतो. पण उद्या शुक्रवारी नमुना पहायला मिळेल. महाराष्ट्राच्या जनतेला प्रॉमिस करतो की ठाकरे सरकारचा आणखी एक घोटाळा समोर ठेवणार आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती