चाइल्ड पोर्नोग्राफीचे भयानक जाळे राज्यात : जळगाव व धुळे जिल्ह्यातील तरुणांना थेट CBIची नोटिस

गुरूवार, 18 नोव्हेंबर 2021 (22:13 IST)
चाईल्ड पोर्नोग्राफी (बाल अश्लिलता) या गंभीर अश्या  गुन्ह्या  प्रकरणी  त्याचे  धागेदोरे थेट उत्तर महाराष्ट्रापर्यंत मिळून आले असून या गंभीर प्रकरणी  केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) ने देशभरात विविध ठिकाणी छापेमारी केली आहे. त्यात धुळे आणि जळगाव जिल्ह्यातील तरुणांचा समावेश आहे. चोपडा तालुक्यातील धानोरा येथील एका तरुणाला तर शिरपूर जवळील ग्रामीण भागात राहणाऱ्या एक व्यक्ती अडकल्याचे कळते आहे. या सर्व प्रकारामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत. मात्र हा किती गंभीर प्रकार आहे हे समोर येते आहे.
 
ऑनलाइन बाल लैंगिक शोषण सामग्रीशी संबंधित गुन्ह्यांवर देशव्यापी समन्वित कारवाईमध्ये केंद्रीय अन्वेषण ब्यूरोने १४.११.२०२१ रोजी ८३ आरोपीविरुद्ध ऑनलाइन बाल लैंगिक शोषण आणि शोषणाशी संबंधित आरोपांवर २३ स्वतंत्र प्रकरणे नोंदवली. यानंतर १६ नोव्हेंबर रोजी देशभरात छापे टाकण्यात आले. यात जळगावातही छापे टाकण्यात आल्याची माहिती सीबीआयने आपल्या अधिकृत प्रेस नोटमध्ये दिली होती. परंतु सीबीआयच्या अधिकृत वेबसाईटवरील एफआयआर सेक्शनमध्ये गुन्ह्याची एफआयार टाकण्यात आली आहे.
 
त्यानुसार धानोरा येथील दीपक नारायण पाटील मोबाईल क्रमांक (9834981952) तसेच राहुल भटा पावरा पोस्ट जोड्या, सांगवी, तालुका शिरपूर, जि. धुळे मोबाईल क्रमांक (9325784232) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्यात 120 ब आणि अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु या गुन्ह्यात या दोघांचा नेमका भाग सहभाग आहे, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.
 
तर पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दीपक पाटीलचा मुलाला नोटीस बजाण्यात आल्याचे कळतेय. तो मुलगा अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षाला असल्याचेही कळते. नोटीसनुसार तो नागपूरला चौकशीसाठी हजर होणार असून त्याने थोडी मुदत मागून घेतली,असल्याचेही कळतेय. यातील दीपक पाटील हे डिजिटल निरक्षर असल्याचेही कळते. दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काल मोबाईलच्या संदर्भात चौकशी करण्यात येत असल्याचे कारण सांगून काही लोकांनी धानोर यातून एकाची चौकशी करत नोटीस बजावली. नोटीस बजावणार लोकांनी नागपूर येथील गुप्तचर यंत्रणांकडून आले असल्याची बतावणी केली होती. एफआयआर नुसार तब्बल 31 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
सीबीआयने १४ नोव्हेंबरला चाइल्ड पॉर्नोग्राफी प्रकरणी ८३ आरोपींविरोधात २३ वेगवेगळे गुन्हे दाखल केले. याच प्रकरणी मंगळवारी सीबीआयने १४ राज्यांमधील ७७ ठिकाणांवर एकाच वेळी छापे टाकले. यामध्ये दिल्लीमधील १९, उत्तर प्रदेशातील ११, आंध्र प्रदेशातील २, गुजरातमधील ३, पंजाबमधील ४, बिहारमधील २, हरियाणामधील ४, ओडिशामधील ३, तामिळनाडूमधील ५, राजस्थानमधील ४, महाराष्ट्रातील ३, छत्तीसगड, मध्ये प्रदेश आणि हिमाचल प्रदेशातील प्रत्येक एक जागेचा समावेश आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती