दहा हजार रुपये अनधिकृत पार्किंगचा दंड

गुरूवार, 20 जून 2019 (16:40 IST)
आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत यापुढे अधिकृत पार्किंगच्या एक किलोमीटरच्या रस्त्यावर अनधिकृत पार्किंग केल्यास 10 हजार रुपये दंड ठोठावला जाणार आहे, यामध्ये शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांना जोडणाऱ्या अनधिकृत पार्किंक केली तरीही दंड होणार आहे, प्रभावी अंमलबाजवाणीसाठी माजी सैनिकांना नेमण्याचे कंत्राटदारांना आदेश देण्यात आले आहेत. मुंबई महापालिका क्षेत्रातील रस्त्यांवर अनधिकृत ‘पार्किंग’ होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे वाहतूकीला प्रचंड  अडथळा निर्माण होतो, त्यामुळे  वाहनांची गती मंदावत आहे, असे मुंबई महापालिकेचे म्हणणे आहे.
 
त्यामुळे नागरिकांना आपली वाहने ‘पार्क’ करणे सुलभ व्हावे, यासाठी महापालिकेद्वारे विविध 146 ठिकाणी तब्बल 34 हजार 808 वाहने ‘पार्क’ करण्याची सुविधा दिली आहे. तरीही  अनेक वाहनतळांचा वापर न करता लगतच्या रस्त्यांवर अनधिकृत पार्किंग नागरिक करतात. हे लक्षात घेऊन वाहनांच्या पार्किंगला शिस्त यावी आणि वाहतूक सुरळीत रहावी, यासाठी पार्किंगजवळील एक किलोमीटरच्या रस्ता, तसेच दोन महत्त्वाच्या रस्त्यांना जोडणारे छोटे रस्ते हे ‘नो पार्किंग झोन’ म्हणून जाहीर करण्याचे आदेश महापालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी सर्व परिमंडळीय उपायुक्तांना दिले आहेत. त्यामुळे आता जर तुम्ही मुंबईत अनधिकृत पार्किंग केली तर दहा हजार रुपयांचा दंड झालाच समजा.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती