काय सांगता,शेतकऱ्याने ढबू मिरची चक्क फुकटात दिली

सोमवार, 23 ऑगस्ट 2021 (12:08 IST)
कुंडलपासून अवघ्या दोन किलोमीटरवर कुंभार गाव येथील शेतकरी भीमराव साळुंखे दरवर्षी ढबू मिरचीची लागवड करतात.ही मिरची ते मुंबई पुणे पाठवतात. यंदाच्या वर्षी ढोबळी मिरची चे पीक चांगले झाले आहे.तरीही बाजारात त्याला योग्य किंमत मिळत नाही.त्यामुळे व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना ढबू मिरची आणू नका असे सांगितले. 
 
ढबू मिरचीचे उत्पादन जास्त झाल्यामुळे आता त्याचे करायचे तरी काय म्हणून शेतकऱ्यांनी ढबू मिरची चक्क फुकटात वाटली.आणि लोकांनी ती नेली सुद्धा.पण कोणाच्याही मनात त्या शेतकऱ्यांसाठी काहीच दयाभाव आला नाही.कोणाचाही मनात त्या शेतकऱ्याला काही पैसे द्यावे असे आले नाही. शेतकरी बाजारपेठेत योग्य भाव मिळत नाही म्हणून त्रासलेला आणि काळजीत आहे.शेतकऱ्याला मदतीची नव्हे तर पिकवलेल्या मालाला योग्य किंमत मिळवून देण्याची गरज आहे.असं शेतकरीचं म्हणणं आहे.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती