शिक्षकाचा देशी जुगाड: विद्यार्थ्यांसाठी बाईकला ट्रॉली जोडली

गुरूवार, 7 एप्रिल 2022 (11:21 IST)
जळगाव- येथील एका शिक्षकाने विद्यार्थ्यांना नेण्यासाठी बाईकला ट्रॉली जोडली. 10 क्विंटल वजन ओढू शकेल अशी चार टायरची ट्रॉली बनविली. या नव्या जुगाडाचे खूप कौतुक होत आहे.
 
एसटी कर्मचारी संपामुळे अनेक ठिकाणी एसटी सेवा बंद असल्याने तसेच पेट्रोल- डिझेलच्या किंमती सातत्याने वाढत असल्याने या जुगाडाचे कौतुक होत आहे. यात एक मोटर सायकलला ट्रॉली जोडण्यात आली आहे. जानेवारी महिन्यापासून शाळा उघडल्यापासून ते रोज 10- 12 विद्यार्थ्यांना बसवून पारोळा येथे नियमित शिकवणी आणि शाळेच्या कामासाठी सोडतात आणि संध्याकाळी परत त्यांना घरी सोडतात. शिक्षक एम. व्ही. पाटील असे यांचे नाव आहे.
 
कोरोनामुळे आधीच मुलांचे खूप नुकसान झाले आहे त्यातून आता सर्व सुरु झाल्यावर एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे बसेस बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होता कामा नये म्हणून आयटीआयचे शिक्षक एम. व्ही पाटील यांनी उपाय शोधून काढला आहे. आपल्या मोटारसायकलला ट्रॉली जोडून ते विनामूल्य विद्यार्थ्यांना शाळेत नेतात आणि सोडतात.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती