ज्यामध्ये महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढल्याची आकडेवारी समोर आल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी थेट मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं आहे. केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये भाजपचीच सत्ता आहे. पण, प्रशासनावर मुख्यमंत्र्यांचा वचक नाही. मुख्यमंत्र्यांकडे गृहखातं आहे. पण, त्यांचा प्रशासनावर वचक नाही. यापूर्वी देखील अनेक मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्रीपदाची जबाबदारी समर्थपणे सांभाळलेली आहे. पण, यावेळी राज्याचे मुख्यमंत्री मात्र अपयशी ठरल्याची टीका यावेळी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.