शिक्षणखर्चा साठी हुशार विद्यार्थी झाला चोर

बुधवार, 15 नोव्हेंबर 2017 (08:13 IST)

अमरावती येथील एका दहावीत ९२ टक्के मिळवून पुढे शिक्षण घेत असेलल्या विज्ञान शाखेत प्रवेश मिळवलेल्या एका हुशार मुलाने  शिक्षण फी म्हणून लागत असलेल्या 60 हजार रुपयांसाठी  मुलाने स्वत:च्याच शाळेत चोरी केली आहे. या मुलाने शाळेतील  नवोदय विद्यालयातून  40 लॅपटॉप चोरले होते. विद्यार्थ्याला त्याच्या भावासह इतर तीन मुलांनी मदत केली आहे. पोलिसानी ही चोरी पकडत सर्वांना ताब्यात घेतले आहे. 

 विद्यार्थ्याने नवोदय महाविद्यालयात पाचवीपासून शिक्षण घेतल असून तो  सीबीएससी मध्ये  10 वीपर्यंत शिक्षण पूर्ण केले आहे. तो मुलगा हुशार असून त्याने दहावीत 92 टक्के मिळवले आहेत . त्याने  विज्ञान शाखेत अकरावीच्या शिक्षणासाठी प्रवेश मिळवला होता. हा विद्यार्थी गरीब  घरातील असून त्यांना खर्च परवडत नाही. त्याला पुढे शिक्षण घेता यावे यासाठी पैशाची गरज होती. त्यामुळे त्याला  60 हजार रुपये इतकी रक्कम कुठून आणायची प्रश्न पडला होता. मग त्याने विचारकरत  कॉम्प्युटर विभागातील लॅपटॉप चोरण्याचं त्याने ठरवलं आणि भावासह इतर मित्रांना सोबत घेऊन चोरी केली. त्यांनी हे सर्व सऱ्या मजल्यावर 30 फुटांवर पाईपने चढून, वर्गाच्या खिडकीची गज कापून, एकूण 40 लॅपटॉपची चोरी या विद्यार्थ्यांनी केली. या चोरीमुळे पोलीस सुद्धा आवाक झाले आहेत. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती