स्वित्झर्लंड ते नाशिकच्या प्रवासात कोरोनाची साथ असताना मी स्वतःला वाचवलं .......

सोमवार, 23 मार्च 2020 (09:52 IST)
13 मार्च रोजी दुपारच्या अडीच वाजेच्या सुमारास माझे (प्राप्ती कवीश्वर) विमान मुंबईच्या छत्रपती शिवाजी विमानतळावर आले. कोरोना ने जगातील बऱ्याच देशांमध्ये आपले पाय रुतले होते.
 
भारतातही या प्राणघातक विषाणूंची सावली पडू लागली होती. माझ्या हृदयाचे ठोके वाढत वाढत मी थरथरत पावलांनी विमानतळावर प्रवेश केला. तेथे शांतता होती त्यामुळे मला थोडं धीर आलं. मला देखील तिथे तपासणीच्या प्रक्रियेतून जावे लागले. तेथून बाहेर पडल्यावर मी थेट माझा घरी नाशिकला जाऊन स्वतःला एकांतात कोंडून घेतले. 
 
एवढेच नव्हेतर सिव्हिल हॉस्पिटल मध्ये जाऊन तपासणी देखील करून घेतली. कुठलीही शंका मनात नसायला. त्याच बरोबर नाशिकच्या महानगरपालिकेत जाऊन परदेशातून परतल्याची सूचनाही दिली. तिथे जाऊन समजले आणि वाईट देखील वाटले की बऱ्याच लोकांनी परदेशातून स्वतःच्या सोबत आणलेल्या प्राणघातक विषाणूंबद्दलची माहिती निव्वळ लपवलीच नाही तर इतर लोकांना पण त्याची लागण देऊन त्यांना त्रासदायक यातना दिल्या.
 
माझे व्यवसाय चार्टड अकाउंटंट चे आहे आणि वित्त संबंधी एका बहुराष्ट्रीय कंपनीत कार्यरत आहे. ऑफिसच्या कामा निमित्तच मी स्वित्झर्लंडला गेले होते. तिथे मला 2  महिने वास्तव्य करावयाचे होते. कोरोनाबद्दल प्रथम वेळीस ऐकल्यावर अशी कल्पनाच केली नव्हती की हा विषाणू एवढ्या झपाट्याने पसरेल आणि त्याचा दुष्प्रभाव एवढ्या कमी वेळात अनेक देशांवर दिसून येईल. तसं तर भारतात माझ्या परत येण्याची वेळ ठरलेली होती. 
 
तरी अशी स्थिती बघून मी जरा घाबरलेच पण त्या परिस्थितीत मला शांत, सामंजस्य, राहणे आणि परिस्थितीचे गांभीर्य समजणे अत्यंत महत्त्वाचे होते. माझ्या पुढे पहिले ध्येय सुरक्षित असणे आणि निरोगी घरी जाणे हे होते. विमानातदेखील मी मास्कचा वापर करत होते आणि आपले हात वारंवार स्वच्छ करत होते. 
 
मुंबई विमानतळावर आल्यावर आम्हाला जाहीरपत्रक देण्यात आले ज्यात प्रवासात आम्ही कोरोना ग्रसित देशाची परदेशवारी केली होती की नाही? हे सांगायचे होते. जाहीरनामा जमा केल्यावर प्रत्येक प्रवाशांची तपासणी करण्यात आली की त्याला ताप आहे की नाही. विमानतळावरची व्यवस्था उत्तम होती. सर्व काही नीट नेटके व्यवस्थित होते. सर्व सूचना स्पष्ट आणि सर्व साइन फलकपण व्यवस्थित होते. विमानतळावरचे सर्व कर्मचारी सौहार्दपूर्ण वागणूक देत होते. घाबरण्यासारखी परिस्थिती अजिबात नव्हती. 
 
माझी सर्व परदेशातून येणाऱ्या प्रवाशांना आग्रहाची विनवणी आहे की ते निव्वळ स्वतःच्या नव्हे तर इतर अन्य लोकांच्या सुरक्षेसाठी सरकारला स्वतः बद्दलची सर्व माहिती द्यावी भारत शासन लोकांच्या सुरक्षेसाठी या दिशेने कौतुकास्पद पाऊल उचलत आहे आणि उचलली आहे. माझ्या मताप्रमाणे वेळीस बंदी घालण्याचीही संपूर्ण प्रक्रियेमुळे ह्या भयानक विषाणूंचा प्रसार थांबविण्यासाठी मदतगार असणार. एक सुजाण आणि सज्ञान नागरिक होण्याच्या नात्याने आपले कर्तव्य आहे की आपण या रोगासंबंधित दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करून त्याची खबरदारी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मी 2 महिन्याने आपल्या मायदेशी परतले आहे ह्याचा आनंद तर मला आहेच. 
मी निरोगी असून मला देवाच्या कृपेने या रोगाची साथ लागली नाही. तसेच कोणते ही लक्षणे देखील नाही. पण ज्यांना ह्या भयावय रोगाची लागण लागली आहे मी त्यांचा वेदना समजू शकते. माझा विश्वास आहे की या परिस्थितीवर मात करण्याचा एकमेव सोपा मार्ग म्हणजे सावधगिरी बाळगणे. 
 
स्वित्झर्लंड मध्ये वास्तव्यास असताना मी सावधगिरी बाळगली असल्यास तरीही स्वतःच्या घरी परतल्यावर देखील मी स्वतःला एकांतात ठेवले आहे. मी लोकांना प्रत्यक्ष न भेटता माझ्या आप्तेष्टांशी मी फोन वर बोलते. मी एका वेगळ्या खोलीत स्वतःला डांबून ठेवले आहे. त्या खोलीला मी दररोज स्वच्छ करते आणि ऑफिसचे काम देखील मी घरी बसून करत आहे. या संपूर्ण प्रकरणात सर्वात वाईट गोष्ट म्हणजे माझ्या आजीला वयोवृद्ध असल्याने इतर ठिकाणी जावे लागले. कारण म्हातारपणामुळे त्यांची काळजी वाटते. कारण हा विषाणू वृद्धांसाठी घातक आहे. वयोवृद्धांसाठी बळी पडतो. त्यामुळे कुठल्याही प्रकाराचा धोका पत्करता येत नाही. 
 
(प्राप्ती कवीश्वर) यांच्याशी झालेल्या संभाषणावर आधारित.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती