राज्यातील धरणाचा जलसाठा वाढवायला सुरुवात

सोमवार, 1 जुलै 2019 (16:26 IST)
मुंबईसह राज्यभरात जोरदार पाऊस बरसयाला सुरुवात झाली आहे. मराठवाडा, विदर्भ, पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रातही रेड अर्लट देण्यात आला आहे. दरम्यान मुंबईसह राज्यात 4 दिवसात तब्बल 606 मिमी पेक्षा जास्त  पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर मुंबईत गेल्या 24 तासात सरासरी 90 मिमी पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. सततच्या पावसामुळे महाराष्ट्रातील अनेक प्रमुख धरणांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. मागील तीन ते चार दिवसातील पावसामुळे राज्यातील धरणाचा जलसाठा वाढवायला सुरुवात झाली आहे. कोकण, पुणे, नाशिक, नागपूर आणि अमरावती या ठिकाणच्या धरणात चांगलीच वाढ झाली आहे. आतापर्यंत काही धरणातील साठ्यात 7 ते 8 टक्के वाढ झाली आहे. तर कोकणात धरणसाठा 3 टक्क्यांनी वाढला आहे. या शिवाय पुणे, नाशिक, नागपुर आणि अमरावती विभागातील धरणातला जलसाठाही वाढायला सुरुवात झाली झाली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती