लवकरच एसटीत व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टम वेळ आणि थांबे कळणार

सोमवार, 21 मे 2018 (14:59 IST)
सर्वांची लाडकी आणि सार्वजनिक वाहन व्यवस्था असल्लेली जीवन वाहिनी असलेली लालपरी अर्थात एसटी आता हायटेक होत आहे. सोबतच  अनधिकृत थांब्यांना देखील आता आळा बसणार आहे. यासाठी लवकरच एसटीत व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टम बसवण्यात येणार आहे. असे मंडळाने स्पष्ट केले आहे. या सर्वाधिक फायदा एसटीची वाट पाहणाऱ्या प्रवाशांना होणार आहे,  एसटी कुठपर्यंत आली, याचा माग मोबाईल अॅपद्वारे घेणं सहज शक्य होणार आहे. एसटी गाड्यांमध्ये ‘व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टम’ बसवण्यात येणार आहे. त्यामुळे किती उशीर किंवा वेळ अगदी प्रवासी वर्गाला कळणार आहे. या सर्व  सुवीधेसाठी मोबाईल अॅप विकसित करण्याबरोबरच स्थानक आणि आगारात इलेक्ट्रॉनिक बोर्डही बसवले जाणार आहेत. मागील वर्षभरापासून ‘व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टिम’ या यंत्रणेवर एसटी महामंडळाकडून काम करण्यात येत आहे.  महामंडळाला आपल्या कार्यालयीन कामाबरोबरच प्रवाशांना बसची माहिती उपलब्ध व्हावी, यासाठी देखील ही यंत्रणा फायदेशीर ठरणार आहे.
यंत्रणा राबवताना त्यात येणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर केल्यानंतर महामंडळाने ही यंत्रणा लागू होणार आहे. निविदा काढून याचे कामही एका कंपनीला देण्यात आलं आहे. कंपनीकडून बस स्थानक, आगारांचे सर्व्हेक्षण केलं जात आहे. त्यामुळे लवकरच एसटी आपल्याला वेळेत सेवा तर देईल सोबत ज्या ठिकाणी ओसाड प्रदेश आहेत तेथे ही गाडी कधी येईल याची माहिती सुद्धा देईल.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती