नेऋत्य मान्सून कोकणात दाखल!

शुक्रवार, 10 जून 2022 (20:25 IST)
मान्सूनच्या येण्याचे वेध सर्वांना लागले होते. गेले कित्येक दिवस राज्याच्या सीमेवर असणारा मान्सून अखेर कोकणात दाखल झाला आहे.अखेर मान्सूनची प्रतीक्षा संपली असून शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. भारतीय हवामान खात्यानं सांगितल्याप्रमाणे नेऋत्य मान्सून अखेरआज कोकणात दाखल झाला आहे. कोकणात मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली होती. हवामान खात्यानं येत्या 24 तासांत मान्सून कोकणात दाखल होण्याचा अंदाज वर्तवला होता. अखेर आज मान्सून मध्य अरबी समुद्राच्या काही भागात, गोवा संपूर्ण भाग, आणि कर्नाटक आणि कोकणच्या काही भागात दाखल झाला आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती