‘ठाकरे सरकारमधील 6 मंत्री आगामी 4 महिन्यात CBI च्या दारात असतील’-किरीट सोमय्या

शुक्रवार, 30 एप्रिल 2021 (08:14 IST)
पुढील चार महिन्यात ठाकरे सरकारचे सहा मंत्री सीबीआयच्या दारात असतील असा दावा भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. तसेच किरीट सोमय्या यांनी यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर आव्हान दिले आहे. किरीट सोमय्या कल्याणमध्ये पाहणी दौऱ्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी खासगी आणि सरकारी रुग्णालयांची पाहणी केली. यावेळी त्यांनी 12 मे पर्यंत योग्य उपाययोजना केल्या नाहीतर मृत्यूचे प्रमाण वाढेल अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.
 
उद्धव ठाकरे आणि त्यांचं सरकार आता भयंकर भयभीत झाले आहे. सीबीआयने पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांचा जबाब घेतला आहे. एफआयआरमध्ये अनिल परब यांचा देखील उल्लेख केला आहे, म्हणून ठाकरे सरकारमधील सहा मंत्री सीबीआयच्या निमंत्रणाची वाट पाहत आहेत. परमबीर सिंग, रश्मी शुक्ला आणि सचिन वाझे यांच्यावर दबाब आणण्याचं काम ठाकरे सरकार करत आहे, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला.
 
किरीट सोमय्या पुढे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांना माझे थेट आव्हान आहे की, येत्या चार महिन्यात तुमच्या मंत्रिमंडळातील आणि सहयोगी सहा सहकारी जे वसुलीत सहभागी होते ते सीबीआयच्या दारात असतील असा दावा सोमय्या यांनी केला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती