अमेरिकेत (युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका) बंदूक हिंसाचाराच्या घटनांमध्ये कोणतीही घट झालेली नाही. अमेरिकेत कुठे ना कुठे गोळीबाराच्या घटना रोज समोर येत असतात. बंदूक हिंसा ही अमेरिकेतील एक अतिशय गंभीर समस्या आहे आणि ती बर्याच काळापासून चालू आहे. या समस्येने देशभरातील लोकांना हैराण केले आहे. सार्वजनिक ठिकाण असो की खाजगी जागा, अमेरिकेतील कोणतीही जागा बंदुकीच्या हिंसाचारापासून सुरक्षित नाही.