सिद्धार्थ उद्याानातील वाघीणीचा मृत्यू, कोरोना अहवाल येणे बाकी

बुधवार, 24 जून 2020 (15:12 IST)
औरंगाबादमधील सिद्धार्थ उद्याानातील सहा वर्षे वयाच्या पट्टेदार ‘करिना’वाघिणीचा बुधवारी पहाटे ५ वाजून २० मिनिटांनी अखेर मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी वाघिणीची करोना चाचणीसाठी नमूने घेण्यात आले होते. त्याचा अहवाल अद्याप आलेला नाही .
 
दोन दिवसांपासून या आजारी वाघिणीच्या रक्ताची देखील तपासणी करण्यात येत होती. मूत्रपिंडाच्या विकारामुळे वाघिणीचा मृत्यू झाला असावा असे प्राथमिक निदान आहे. मात्र, करोना काळ असल्याने वैद्यकीय संशोधन परिषद आणि केंद्रीय प्राणीसंग्रहालयाकडून येणाऱ्या मार्गदर्शक तत्त्वानुसार पुढील कारवाई केली जाणार आहे.
 
या प्राणी संग्रहालयात पाच मादी आणि चार नर वाघ आहेत. त्यातील ‘करिना’वाघिणीने दोन दिवसापूर्वी खाणे- पिणे सोडून दिल्यानंतर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीला सुरुवात केली होती. महापालिका आयुक्तांनाही प्राणीसंग्रहालयास मंगळवारी भेट दिली होती. त्यानंतर  वाघिणीचे रक्त आणि लघवीचे नमूने घेण्यात आले होते. 
 
आता करिना वाघिणीच्या मृत्यूनंतर आता प्राणिसंग्रहालयातील अन्य वाघांची तपासणी आता केली जात आहे. मात्र, करोना काळ असल्याने वैद्याकीय संशोधन परिषद आणि केंद्रीय प्राणीसंग्रहालयाकडून येणाऱ्या मार्गदर्शक तत्त्वानुसार पुढील कारवाई केली जाणार असल्याचे आयुक्त पांडेय म्हणाले आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती