पुण्यात उद्धव ठाकरे गटाला धक्का; जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरेंचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश

शनिवार, 22 एप्रिल 2023 (09:41 IST)
मागील काही महिन्यापासून राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. अशातच पुण्यात उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाचे पुणे जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे यांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.  पुण्याचे ठाकरे गटाचे खंदशिलेदार शिवसेनेत जाणार असल्याने ठाकरे गटाला पुण्यात मोठा धक्का सहन करावा लागणार आहे.
 
आज संध्याकाळी बाळासाहेब चांदेरे यांचा मुंबईत पक्ष प्रवेश होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत चांदेरे यांच्यासह अनेकजण शिंदे गटात करणार प्रवेश करणार आहेत. भोर वेल्हा मुळशी या भागतील अनेक शिवसैनिक ठाकरेंची साथ सोडणार आहे. पुणे जिल्ह्यात चांदेरे भोर विधानसभा लढण्यासाठी ईच्छुक आहेत. मात्र महा विकास आघाडीत भोर मतदार संघ काँग्रेसकडे असल्याने चांदेरे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
 
दरम्यान महाविकास आघाडीत काम करत असताना घुसमट होत होती. पाहिजे तसा वाव मिळत नव्हता. त्यामुळे मी पदाचा राजीनामा दिला आहे. आता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात पुणे जिल्ह्यात शिवसेना वाढवण्याचं काम करू, असं बाळासाहेब चांदेरे यांनी म्हटलं आहे. बाळासाहेब चांदेरे यांनी पुरंदर, हवेली आणि भोर या तीन तालुक्यात ठाकरे गटाचं मोठं काम केलं आहे. या तीन तालुक्यात त्यांचा मोठा जनसंपर्क आहे. त्यामुळे शिंदे गटाला या तीन तालुक्यात पाय रोवण्यास मदत होणार आहे. शिंदे गटाने पुण्यात निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोर्चे बांधणीला चांगलीच सुरुवात केली आहे.

Edited By - Ratnadeep ranshoor 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती