वास्तविक जम्मू क्षेत्र ‘भूगोला’ने कश्मीरपेक्षा मोठे आहे, तरीही येथून कमी आमदार निवडले जातात. हिंदू मुख्यमंत्री होऊ नये व मुसलमानांना खूश ठेवावे यासाठीच जणू ही योजना असावी. हे आता थांबले पाहिजे. कश्मीरचा राजा हरिसिंग हिंदू होता, पण स्वातंत्र्यानंतर एकदादेखील जम्मू-कश्मीरचा तेथे हिंदू मुख्यमंत्री झाला नाही. जणू काही हिंदूंच्या हाती सत्ता गेली तर आभाळ कोसळेल. ही मानसिकता बदलण्याचा प्रयत्न कधीच झाला नाही. ते आता होणार असेल तर त्याचे स्वागत व्हायला हवे. हे कार्य अर्थातच सोपे नाही. कायदेशीरदृष्टय़ा नवी जनगणना पूर्ण होईपर्यंत, म्हणजे जून 2026 पर्यंत जम्मू-कश्मीरमधील मतदारसंघ पुनर्रचना करता येणार नाही. तरीही विद्यमान सरकार तसा काही इरादा दाखवत असेल तर चांगलेच आहे.