संबंधित व्हिडीओ शेअर होताच यावर मनसेनं आक्षेप घेतला आहे. शिवसेनेनं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये राज ठाकरे यांच्या सभेचे फोटो आणि दृश्य वापरल्याचा दावा मनसेचे नेते गजानन काळे यांनी केला आहे. यावेळी त्यांनी शिवसेनेच्या व्हिडीओमधील काही स्क्रीनशॉट्स आपल्या ट्विटर खात्यावरून शेअर करत शिवसेनेवर खोचक टीका केली आहे.असली नकली म्हणाऱ्यानी स्वतः चे आत्मपरीक्षण करा..काहीतरी अस्सल तुमचे असुद्या.
— Gajanan Kale (@GajananKaleMNS) May 11, 2022
इतके ही नकली होऊ नका.
सभा शिवसेनेची आणि व्हिडिओ मध्ये गर्दी मनसेच्या सभेची...अजून माणसं जमा करायला राजसाहेबांचाच आधार घ्यावा लागतो का ..? लक्षात आल्यावर ट्विट डिलिट करण्याची नामुष्की...नकली हिंदुत्ववादी pic.twitter.com/LVKtoq7e6t