शिवसेना नेत्याची घरात घुसून हत्या !

शुक्रवार, 4 फेब्रुवारी 2022 (08:03 IST)
यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे शिवसेनेचे संचालक सुनील डिवरे यांची  (ता. ३ फेब्रुवारी) गोळ्या झाडून निर्घृण खून करण्यात आला आहे. या घटनेनंतर शिवसैनिकांनी यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात मोठी गर्दी केली  पोलिसांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आल्याची माहिती आहे.
 
शिवसेना नेत्याच्या खुनामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. अज्ञात आरोपींनी यवतमाळमध्येच सुनील यांच्यावर गोळीबार केला. सुनील हे यवतमाळच्या भांब राजा गावाचे रहिवासे होते. ते यवतमाळच्या ग्रामीण भागातील प्रख्यात शिवसेनेचे नेते होते.
त्यांच्यावर आज दोन ते तीन अज्ञात तरुणांनी हल्ला करत गोळ्या झाडून हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि १५ वर्षाचा मुलगा घटनेचा प्रत्यक्षदर्शी, मारेकरी गावातील सुनील डिवरे यांच्यावर हल्ला करण्यासाठी आलेल्या तिघांनी सर्वप्रथम कुऱ्हाडीचे घाव घातले. त्यानंतर त्याच्या पोटात बंदुकीतून गोळी झाडली.
डिवरे जागेवरच गतप्राण झाल्याचे लक्षात येताच मारेकऱ्यांनी हवेतही राऊंड फायर करीत जल्लोष करून तेथून पळ काढला. हा सर्व घटनाक्रम डिवरे यांचा १५ वर्षाचा मुलगा दाराआडून बघत होता.मारेकरी हे गावातीलच असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. काही महिन्यापूर्वी झालेल्या भांडणातूनच हा वचपा काढण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
खुनाच्या घटनेनंतर भांबराजा येथे तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. डिवरे समर्थक विरोधकांच्या घरावर धावून जात आहे. या ठिकाणी राखीव पोलीस दलालाही पाचारण करण्यात आले आहे .या घटनेनंतर संतप्त जमावाकडून पोलिसांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली आहे. पोलिसांनी जादा कुमक मागवून जमावाला वेळीच नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, सुनील डिवरे भांब राजा या ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य होते.
यवतमाळ जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील शिवसेनेचे मोठे नेते म्हणून सुनील डिवरे यांची ओळख होती. यवतमाळ जिल्हा परिषदेची आगामी निवडणूक लढवण्यासाठी डिवरे हे इच्छूक होते. त्याअगोदरच त्यांचा गोळ्या झाडून खून करण्यात आला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती