शिवसेनेचे लोकसभेतील प्रमुख व्हीप श्रीरंग बारणे म्हणाले, “सर्व शिवसेना लोकसभा खासदारांना कळविण्यात येते की, उद्या, मंगळवार, 17 डिसेंबर रोजी लोकसभेत काही अत्यंत महत्त्वाचे मुद्दे/विधानिक कामकाज चर्चेसाठी आणि पारित करण्यासाठी मांडले जाणार आहेत. शिवसेना पक्षाच्या सर्व लोकसभा सदस्यांना विनंती आहे की त्यांनी उद्या संपूर्ण वेळ सभागृहात उपस्थित राहावे.
केंद्रीय मंत्रिमंडळाने या महिन्याच्या सुरुवातीला 'वन नेशन, वन इलेक्शन' विधेयकाला मंजुरी दिली होती. भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष या विधेयकाला पाठिंबा देत आहेत, तर काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि द्रमुकसह अनेक विरोधी पक्ष याला विरोध करत आहेत.