शरद पवार यांचे भाजपला चोख प्रतिउत्तर

मंगळवार, 18 फेब्रुवारी 2020 (16:39 IST)
“मध्यावधी निवडणुका फक्त देशात होतात. त्या घ्यायच्या असल्या तर घ्या,” असं सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी थेट लोकसभेच्या निवडणूका घेण्याचं आव्हान भाजपाला केलं आहे. दिल्लीत भाजपाचा दारुण पराभव झालेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पवारांनी महाराष्ट्रातील सरकारसंदर्भात वक्तव्य करणाऱ्या भाजपाला मुंबईतील पत्रकार परिषदेमध्ये सुनावले आहे.
 
मुंबईमध्ये शरद पवारांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेदरम्यान त्यांना महाविकास आघाडीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. “मध्यावधी निवडणुकांसाठी आम्ही तयारी करत आहोत. लवकरच महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका होतील असं भाजपाकडून सांगितलं जात आहे, याबद्दल तुमचं काय मत आहे?,” असा प्रश्न पत्रकारांनी पवारांना विचारला. यावर उत्तर देताना पवारांनी मध्यावधी राज्याच्या होत नाही संपूर्ण देशाच्या होतात असं सांगत भाजपालाच टोला लगावला.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती