शरद पवारांनी Z+ सुरक्षा उपाय नाकारली, वाहन बदलण्यास सहमती नाही दर्शवली

शनिवार, 31 ऑगस्ट 2024 (09:18 IST)
केंद्रीय गृहमंत्रालयाने शरद पवार तसेच इतर अनेक नेत्यांची सुरक्षा वाढवण्याचा निर्णय नुकताच घेतला होता. तसेच सरकारने शरद पवार यांना झेड प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला. सुरक्षेसाठी करण्यात येत असलेल्या अनेक उपायांना आता पवारांनी नकार दिल्याचे सांगण्यात येत आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी सुरक्षा यंत्रणांनी सुचविलेल्या काही उपाययोजना स्वीकारण्यास नकार दिला आहे. तसेच केंद्रीय गृहमंत्रालयाने शरद पवार यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच सांगण्यात येत आहे की, त्यांनी सुरक्षा यंत्रणांनी केलेल्या उपाययोजना स्वीकारण्यास नकार दिला आहे.
 
केंद्रीय संस्थांनी केलेल्या सुरक्षेचा आढावा घेतल्यानंतर पवारांना CRPF झेड प्लस सुरक्षा दिली होती. त्यांची सुरक्षा का वाढवली जात आहे, हे त्यांना सांगण्यात आले नाही, असे पवार यांनी सांगितले आहे. 
 
तसेच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्र्यांनी दिल्लीतील त्यांच्या घरात सुरक्षा कर्मचारी तैनात करणे, तसेच राजधानीत ये-जा करण्यासाठी वापरत असलेले वाहन बदलणे आणि त्यांच्या वाहनात दोन सुरक्षा कर्मचारी तैनात करण्याचे प्रस्ताव नाकारले आहेत. सुरक्षेचा एक भाग म्हणून पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानाच्या भिंतीची उंचीही वाढवली जाणार होती.
 
मिळालेल्या माहितीनुसार शरद पवारांनी शुक्रवारी झालेल्या बैठकीत सुरक्षा यंत्रणांच्या CRPF आणि दिल्ली पोलिसांना आपल्या सूचना दिल्या. तसेच या बैठकीत दिल्ली अग्निशमन सेवा, केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभाग, नवी दिल्ली नगर परिषद आणि केंद्रीय गृह मंत्रालयाचे प्रतिनिधीही उपस्थित होते.

Edited By- Dhanashri Naik 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती