यावेळी, केवळ एकाच मुलीवर कुटुंब नियोजन केल्यावर कोणता सामना करावा लागला, असं विचारलं असता शरद पवारांनी उत्तर दिलं की, "मला फारसा काही सामना करावा लागला नाही. पण काही वेळा विविध प्रश्नांना तोंड द्यावं लागलं. एकदा निवडणुकीनिमित्त एका गावात गेलो होतो. यावेळी एका वयोवृद्ध व्यक्तीने विचारलं, तुम्हाला एकच मुलगी आहे, उद्या अचानक काही झालं तर अग्नी कोण देणार?"
"तेव्हा मी त्यांना सांगितलं, मला एकच मुलगी आहे आणि मला अजिबात काळजी नाही. लोकांना अग्नीची चिंता आहे, ही गोष्ट मला काही मान्य नाही. हे मी त्यांना स्पष्ट सांगितलं." "जिवंत असताना मुलीशी नीट वागण्याची चिंता करायची की मेल्यावर चितेला अग्नी कोण देणार याची चिंता करायची?" असंही पवार म्हणाले.