भयंकर : सात वर्षांच्या मुलीची बलात्कार करून हत्या

बुधवार, 23 जानेवारी 2019 (15:53 IST)
पिंपरी- चिंचवडमधील दापोडी येथे सात वर्षांच्या मुलीवर अज्ञात नराधमाने  बलात्कारानंतर मुलीची हत्या केली आहे. पीडित मुलीची आई कामावर गेली होती. तर बहीण शाळेत गेली असताना नराधमाने त्या चिमुकलीवर बलात्कार केला. या प्रकरणातील संशयित आरोपीनेही आत्महत्या केल्याने गूढ वाढले आहे.
 

आई कामावरून आल्यानंतर मुलगी बेडच्या खाली निपचित पडल्याचे निदर्शनास आले. तिने मुलीला घेऊन यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय गाठले. तिथे डॉक्टरांनी मुलीला मृत घोषित केले. वैद्यकीय तपासणीत मुलीवर बलात्कार झाल्याचे उघड झाले आहे. मयत मुलीची आई आणि संशयित आरोपी हे एका खानावळीत काम करायचे. रात्री दोघांचे भांडण झाले होते. ‘तुला उद्या बघून घेईन’, अशी धमकी त्याने मुलीच्या आईला दिली होती.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती