महाडमध्ये एसडीआरफचा बेस कॅम्प उभारणार

बुधवार, 28 जुलै 2021 (23:25 IST)
कोकणात वारंवार येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महाडमध्ये एसडीआरफ (NDRF)चा बेस कॅम्प उभारण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक असल्याची माहिती रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी दिलीय. केंद्राकडे एनडीआरएफचा बेस कॅम्प उभारण्याची मागणी केली आहे. मात्र केंद्राच्या निर्णयात अडथळे येत असतील तर राज्य सरकार एसडीआरएफचा कॅम्प उभारणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच दरळ कोसळल्यामुळे उद्ध्वस्त झालेल्या तळीये गावाचं पुढच्या सहा महिन्यांत पुनर्वसन करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.  राज्य मंत्रिमंडळाच्या  पार पडलेल्या बैठकीनंतर आयोजित पत्रकारपरिषदेत बोलताना आदिती तटकरे यांनी  हि माहिती दिली. 
 
जिथे आता गाव होते त्याच्या जवळच पुनर्वसन केलं जावं अशी मागणी दुर्घटनाग्रस्त तळीये गावातील लोकांची आहे. पुनर्वसनाच्या विषयावर ग्रामस्थांबरोबर चर्चा करूनच निर्णय घेतला जाईल, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे. मुख्यमंत्री दौऱ्यावर आले होते तेव्हा त्यांनी स्थानिकांना आश्वासित केलेलं होतं, की त्यांच्या इच्छेनुसारच त्यांच्या पूनर्वसनाबाबत योग्य तो निर्णय घेईल. तळीये गावातील लोकांचं पुनर्वसन त्यांनी सांगितलेल्या जागी 6 महिन्यात केले जाईल अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती