महिला व अपंग संशोधकांना प्रबंध सादर करण्यास मुदतवाढ

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेकडून पीएच.डीच्या नियमात बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे पीएच.डी प्रवेश पात्रतेबरोबरच, प्रवेशपूर्व परीक्षा, प्रबंध सादर करण्याच्या कालमर्यादा तसेच लेखनपध्दती बदलणार आहेत.

या नवीन नियमात महिला व अपंग संशोधकांना प्रबंध सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आलेली आहे.विद्यापीठ अनुदान आयोगाच्या आदेशानुसार योग्य ते बदल करण्यात आले आहेत. यासंदर्भातील नियमावली पुणे विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना नव्या मार्गदर्शकाचा शोध घ्यावा लागत आहे त्यातच विद्यापीठाने पीएच. डी ट्रॅकिंग सिस्टम सुरू केल्याने विद्यार्थ्यांची माहिती ऑनलाईन उपलब्ध होत आहे.

वेबदुनिया वर वाचा