सप्तश्रुंगी गडावरील मंदिरात बोकडाचा बळी देण्यास प्रशासनाने बंदी घातली आहे. त्यानंतर गावकरी आणि प्रशासन यांच्यात वाद झाला होता. मात्र गावकऱ्यांनी मंदिराच्या पायथ्याला बोकडाचा बळी दिला आहे. याआधी २०१६ साली उत्सवात बोकड बळी देण्याच्या वेळी बंदुकीच्या छऱ्याने १२ जण जखमी झाले होते. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव बोकड बळीची प्रथा बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता.
नवरात्र उत्सवामध्ये सप्तश्रुंगी गडावर दसऱ्याच्या दिवशी महिषासुराच्या रुपात बोकडाचा बळी देण्याची धार्मिक प्रथा आहे. मात्र गावकऱ्यांनी सुरुवातीला विरोध केला होता. त्यामुळे गावकऱ्यांनी मिरवणूक काढून गडाच्या पहिल्या पायरीवर बोकड्याची पूजा केली असून , पायथ्याला बोकड्याचा बळी देण्यात आला आहे.