जर एकनाथ शिंदे खरंच हिंदूहृदयसम्राट असतील तर त्यांनी असं काय महान कार्य केलंय ते पहावं लागेल. आम्ही हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचं काम पाहिलंय. त्यांच्यासोबत काम केलंय. त्यांनी कधीच सत्तेसाठी तडजोड केली नाही, अशा शब्दांत संजय राऊतांनी मुख्यमंत्री शिंदेंवर टीका केली आहे.
गेल्या ४ दिवसांत २ कॅप्टनसह ४ जवानांचं बलिदान दिलं. यावर गृहमंत्री आणि संरक्षणमंत्र्यांकडून कोणत्याही प्रकारे संवेदना व्यक्त करण्यात आली नाही. केंद्र सरकार ५ राज्यांच्या निवडणुकीत व्यस्त आहे. त्यांना काँग्रेस मुक्त भारत आणि शिवसेना मुक्त माहाराष्ट्र करायचा होता. मात्र हे काही झालं नाही, अशा शब्दांत राऊतांनी केंद्र सरकारवर देखील निशाणा साधलाय.