मंदिरावर दरोडा, दरोडेखोर दानपेट्या चोरून फरार

शुक्रवार, 10 मे 2019 (16:30 IST)
महाराष्ट्रातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या वज्रेश्वरी देवीच्या मंदिरात मध्यरात्री 3 च्यासुमारास दरोडेखोरांनी सुरक्षारक्षकाला बेदम मारहाण करून मंदिरातील 5 दानपेट्या चोरून फरार झाले आहेत. दरम्यान, संतप्त ग्रामस्थांनी याच्या निषेधार्थ आज गाव बंद ठेवून निषेध नोंदवणार आहेत.
 
मिळालेल्या माहितीनुसार 4 ते 5 दरोडेखोरांनी मिळून तलवार-चॉपरचा धाक दाखवून वॉचमनचे हातपाय रस्सीने बांधून ठेवले. तसेच पुजाऱ्याला मारहाण करून मंदिरातल्या दानपेट्या फोडल्या आणि रक्कम घेऊन पळाले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, दरोड्याच्या घटनेनंतर मंदिराच्या विश्वस्त मंडळाने आज दर्शनासाठी मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मंदिराच्या पायथ्याशी भाविकांना तशी माहिती देण्यासाठी म्हणून फलक लावण्यात आला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती