आदर्श घोटाळाप्रकरणी अशोक चव्हाणांना दिलासा

शुक्रवार, 22 डिसेंबर 2017 (14:48 IST)
माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना आदर्श घोटाळ्याप्रकरणी मोठा दिलासा मिळाला आहे. आदर्श घोटाळाप्रकरणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याविरोधात खटला चालवण्यास हायकोर्टाने स्थगिती दिलीय. या प्रकरणाचा खटला भरण्यासाठी राज्यपाल सी.विद्यासागर राव यांनी मंजुरी दिली होती. मात्र, राज्यपालांचे हे आदेश हायकोर्टाने बेकायदेशीर असल्याचे सांगत रद्द केले आहेत. हायकोर्टाच्या या निर्णयामुळे अशोक चव्हाणांना आदर्श प्रकरणी मोठा दिलासा मिळालाय.
 
आदर्श सोसायटीमध्ये अशोक चव्हाण यांच्या तीन नातेवाईकांना सदनिका देण्यात आल्याचे समोर आल्यानंतर नोव्हेंबर 2010 मध्ये अशोक चव्हाण यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले होते. दरम्यान, गुरुवारी (21 डिसेंबर )सीबीआयच्या विशेष न्यायालयाने टू जी घोटाळाप्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली होती. त्यानंतर शुक्रवारी आदर्श घोटाळ्यात अशोक चव्हाण यांना मिळालेला दिलासा मिळाला आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती