महाराष्ट्रात व घाट परिसरामध्ये रेड अलर्ट घोषित,पर्वतांमध्ये पुराचा धोका

शुक्रवार, 2 ऑगस्ट 2024 (10:27 IST)
देशात सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. हवामान खात्याने आज म्हणजेच 2 ऑगस्ट रोजी देशाच्या अनेक भागात अतिमुसळधार पावसासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. कर्नाटक, गुजरात, राजस्थान, छत्तीसगड, आसाम, मेघालय, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे.
 
भारतातील अनेक भागामध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. तसेच पर्वत रांगांमध्ये ढगफुटी झाल्याने हाहाकार झाला आहे. केरळमधील वायनाड मध्ये लँडस्लाईड मध्ये अनेक लोकांचा जीव गेला आहे. 
 
तसेच आज 2 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र, पूर्व मध्य प्रदेश मध्ये रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे. तर हवामान विभागाने हिमाचल प्रदेश, केरळ, कोकण, उत्तराखंड, गोवा, गुजरात, राजस्थान, कर्नाटक, आसाम , मेघालय सोबत देशातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाचा अलर्ट दिला आहे. 
 
महाराष्ट्रात रेड अलर्ट घोषित-
महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, पालघर मध्ये येलो अलर्ट घोषित केला आहे. जेव्हा की, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्ये ऑरेंज अलर्ट घोषित केला आहे. याशिवाय पुणे, कोल्हापूर, सातारा व घाट परिसरामध्ये रेड अलर्ट घोषित केला आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती