माध्यमांशी बोलताना रवींद्र धंगेकर म्हणाले, मी गेल्या १०-१२ वर्षांपासून पक्षासोबत काम करत आहे. यामुळे पक्षातील अनेक लोकांशी माझे कौटुंबिक संबंध निर्माण झाले आहे. सर्वांनी मला खूप प्रेम दिले आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत सर्वजण माझ्या मागे उभे राहिले. मी निवडणूक हरलो, ही नंतरची बाब आहे, पण प्रत्येकाने आपापल्या क्षमतेनुसार काम केले. उदय सामंत यांच्याशी झालेल्या भेटीबद्दल बोलताना ते म्हणाले, मी उदय सामंत यांच्याही संपर्कात होतो. मी काँग्रेसचा आमदार असतानाही एकनाथ शिंदे यांनी मला मदत केली होती. ज्यांचे चेहरे सामान्य माणसापर्यंत पोहोचले आहे त्यांच्यासोबत काम करण्यात काहीच अडचण नाही हे मला जाणवले. मी आज ठरवलंय, मी शिंदे साहेबांसोबत काम करेन. तसेच रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला, महायुतीच्या या पक्षात जाण्याचे संकेत दिले.