मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पिडीत महिला केडगाव परिसरातील असून ती देवदर्शनासाठी नारायणपूर येथे गेली होती. मात्र महिलेला घरी येण्यासाठी रात्री उशिर झाल्याने पारगाव चौफुला येथे गाडीसाठी उभी होती. यावेळी त्या ठिकाणी फॉर्चूनर गाडीतून आलेल्या दोन तरुणांनी शिंदवणे घाटामध्ये नेवून महिलेवर बलात्कार केला व नंतर घाटामध्येच सोडून दिले.