राजू शेट्टी पुन्हा आक्रमक, मुख्यमंत्र्यांच्या घरावर चाल करणार असा दिला इशारा

मंगळवार, 11 जून 2019 (16:22 IST)
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी अमरावती जिल्ह्यातील लोणी (ता. वरूड) येथे झालेल्या दुष्काळ पाणी परिषदेत त्यांनी सरकारचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला.  
 
विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे आठ दिवसांत तातडीने पंचनामे करावेत व वाळलेल्या संत्रा बागेला १ लाख तसेच टँकरने पाणी घालून जगविलेल्या संत्रा उत्पादक शेतकऱ्यास एकरी ५० हजार रूपये तातडीची मदत करावी, अशी मागणी राजू शेट्टी यांनी या परिषेदत केली. गरज पडल्यास शेतकरी प्रश्नी मुख्यमंत्र्यांच्या घरावर चाल करणार, असा इशाराही त्यांनी दिलाय. या परिषेदत अनेक मागण्या सर्वानुमते करण्यात आल्या.
 
जलयुक्त शिवार योजनेमध्ये वरूड तालुक्यात ५०० कोटी रूपये खर्चूनही कूपनलिकेला १२०० फुटांपर्यंत पाणी लागेना. मग इतका पैसा खर्च करूनही हे पाणी मुरले कुठे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. यामुळे यामध्ये झालेल्या भ्रष्ट्राचाराची निवृत्त अभियंता व सुशिक्षीत बेरोजगार अभियंत्यामार्फत चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती